एसटी आरक्षणाला "सर्व्हर डाउन'चा फटका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - एसटीच्या ऑनलाइन आरक्षणाला "सर्व्हर डाउन'चा फटका बसत आहे. गुरुवारी (ता. 23) रात्री साडेअकराला ही प्रणालीच बंद पडली. एसटीचे सर्वाधिक भारमान रक्षाबंधनाच्या सणाला असताना त्याआधी 24 तास ऑनलाइन आरक्षणासाठी खोळंबा झाला. 

ऑनलाइन तिकीट रद्द झाल्यानंतर त्याचा परतावा ऑनलाइन देण्याची सुविधा एसटीत नाही. आता तांत्रिक बिघाडामुळे अधिकृत संकेतस्थळाचे सर्व्हर डाउन होत असल्याने आरक्षणासाठी प्रवाशांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी रात्री ऑनलाइन आरक्षण प्रक्रिया बंद पडल्यावर महामंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाडाचे कारण सांगण्यात आले. तासाभरानंतर पुन्हा ऑनलाइन आरक्षण करता येईल, अशी माहिती देण्यात आली. 

ऑनलाइन आरक्षण प्रणालीत बिघाड नेमका कशामुळे होत आहे, हे पाहावे लागेल. त्यानंतर तत्काळ उपाय केला जाईल. 
- रणजित देओल, उपाध्यक्ष, एसटी महामंडळ 

Web Title: ST Reservations Server Down