आंदोलनांमध्ये एसटीच लक्ष्य

आंदोलनांमध्ये एसटीच लक्ष्य

मुंबई - राज्यात प्रत्येक आंदोलनात एसटी बसला लक्ष्य केले जात आहे. वर्षभरात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये ३०० गाड्यांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला ९१ लाखांचे नुकसान सहन करावे लागले.

राज्यभरात वर्षभरात विविध आंदोलने झाली. बहुतेक वेळी एसटी बसला लक्ष्य करण्यात आले. एसटी गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक आणि जाळपोळ करत सरकारप्रति नाराजी व्यक्त केली. त्यामुळे तोट्यात चालणाऱ्या एसटीच्या नुकसानात भर पडली आहे. ५ जून २०१७ ते १८ जुलै २०१८ दरम्यान एकूण २२२ एसटीच्या बसचे एकूण ९० लाख ८८ हजारांचे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या दूध दराच्या आंदोलनामुळे राज्यातील नऊ एसटी बसचे एक लाख १२ हजारांचे नुकसान झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनात राज्यात ५८ एसटी बस फोडण्यात आल्या, त्यामुळे एसटीचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या वार्षिक ५४४ कोटींचा तोटा सहन करणाऱ्या महामंडळाच्या तोट्यात आणखी भर पडली आहे.

बस ही सामान्य माणसांची आहे, त्या फोडून तुम्ही काय मिळवता? फोडलेल्या बस वाहतुकीतून बाद होतात. त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे आंदोलकांनी सामान्यांची असणाऱ्या एसटी गाड्यांना लक्ष्य करू नये.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री 

एसटीवर दगडफेक करणाऱ्याला कधीही बसमधून प्रवास करण्यास कायमची बंदी करण्यात यावी. त्याचे छायाचित्र एसटी स्टॅंडवर लावून त्याची महिती सर्व चालक- वाहकांना द्यावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com