टोल भरण्यासाठी एसटीला ई-टॅग!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - टोल भरण्यासाठी एसटीच्या बसवर ई-टॅग प्रणाली लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टोलची रक्कम थेट बॅंक खात्यातूनच वजा होणार आहे. त्यातून 10 टक्के सूट एसटी बसना मिळेल. राष्ट्रीय महामार्गावरील 43 टोल नाक्‍यांवरून एसटीच्या साडेतीन हजारांहून अधिक बस जातात. काही महापालिका क्षेत्रांतील टोल नाक्‍यांवरून बस जातात. तिथे वर्षाला सुमारे 135 कोटींचा टोल भरावा लागतो. यात वेळ वाया जातो. यावर पर्याय म्हणून एसटी बसवर "ई-टॅग' बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने एका बॅंकेबरोबर करार केला असून, ही बॅंक बसना ई-टॅग लावणार आहे. सुरवातीला राष्ट्रीय महामार्गांवरून जाणाऱ्या बसना टॅग लावला जाईल.

मुंबई - टोल भरण्यासाठी एसटीच्या बसवर ई-टॅग प्रणाली लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टोलची रक्कम थेट बॅंक खात्यातूनच वजा होणार आहे. त्यातून 10 टक्के सूट एसटी बसना मिळेल. राष्ट्रीय महामार्गावरील 43 टोल नाक्‍यांवरून एसटीच्या साडेतीन हजारांहून अधिक बस जातात. काही महापालिका क्षेत्रांतील टोल नाक्‍यांवरून बस जातात. तिथे वर्षाला सुमारे 135 कोटींचा टोल भरावा लागतो. यात वेळ वाया जातो. यावर पर्याय म्हणून एसटी बसवर "ई-टॅग' बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने एका बॅंकेबरोबर करार केला असून, ही बॅंक बसना ई-टॅग लावणार आहे. सुरवातीला राष्ट्रीय महामार्गांवरून जाणाऱ्या बसना टॅग लावला जाईल. या टॅगवर बसचा नंबर आणि बस कोणत्या आगाराची आहे, ही माहिती असेल. त्यामुळे टोल नाक्‍यावर येताच आरएफआयडीद्वारे (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन) बसवरील टॅगमधून त्याची माहिती त्वरित घेतली जाईल.

Web Title: ST for toll payment to the e-tag!