एसटी प्रवास आजपासून महागला, ५ रुपयांच्या पटीत भाडेवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

अकाेला  ः महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाने जाहीर केलेली भाडे वाढ शुक्रवारी (ता.१५) मध्यरात्रीपासून लागू करण्यात येते आहे. पाच ते दहा रुपयांच्या पटीत याप्रमाणे २० ते ४५ रूपयांपर्यंत भाडे वाढ वेगवेगळ्या मार्गांवर झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे माेजावे लागणार आहेत.

एसटी महामंडळाने यापूर्वीच भाडेवाढ जाहीर केली हाेती. परंतु, त्याची अंमलबजावणी शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या पहिल्यातील प्रवास भाड्यात एक ते साडे तीन रूपयांपर्यंत वाढ झालेली आहे. साधी, जलद, रात्रसेवा, निमआराम बस, शिवशाही गाड्यांकरीता प्रथम टप्यात किमान प्रवासभाडे दहा रूपये झाले असून मुलांसाठी पाच रूपये आहे.

पास धारक विद्यार्थ्यांना दिलासा
ज्या विद्यार्थ्यांच्या एसटी पासची मुदत १६ जून नंतर संपत असेल, अशा पासधारकांना नवीन भाडेवाढ लागु हाेणार नाही. परंतु, १६ जून नंतर ज्यांचे पास नुतनीकरण करण्यात येतील किंवा, नवीन पासधारकांना नवे भाडे लागु असणार आहेत.

असे आहे वाढीव भाडे-(रूपयांत)
शहर सर्वसाधारण/ जलद रातराणी निमआराम
जुने नवीन जुने नवीन जुने नवीन
पुणे ६१७ ६२५ ७३१ ७४० ८३९ ८५०
नागपूर ३१२ ३२० ३७१ ३८० ४२४ ४३५
औरंगाबाद ४६७ ४७५ ५४६ ५५५ ६२४ ६३५
अमरावती ११३ १२० १३१ १४० १५४ १६५
खामगाव ४७ ५५ ५६ ६५ ५९ ७०
..............
शहर सर्वसाधारण/ जलद रातराणी निमआराम
जुने नवीन जुने नवीन जुने नवीन
अकाेट ५३ ६० ६१ ७० ६९ ८०
तेल्हारा ६२ ७० ७१ ८० ७९ ९०
बार्शिटाकळी १७ २५ १७ २५ २९ ४०
पातूर ३२ ४० ३६ ४५ ३९ ५०
बाळापूर २२ ३० २६ ३५ २९ ४०
मूर्तिजापूर ४८ ५५ ५६ ६५ ५९ ७०

Web Title: st traveling becomes costly