एसटीच्या ‘व्हेइकल ट्रॅकिंग’चा बोजवारा

st-vehicle--tracking
st-vehicle--tracking

मुंबई - एसटी महामंडळाने प्रवाशांना बसबाबत स्थानकांमध्येच इत्थंभूत माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमचा (व्हीटीएस) बोजवारा उडाला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, दादर, कुर्ला, ठाणे, बोरिवली स्थानकांवरील स्क्रीन शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. विशेष म्हणजे, एसटीच्या चौकशी केंद्रावरील अधिकारीही यापासून अनभिज्ञ आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बस असून, दररोज ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी एसटीने ‘व्हीटीएस’ सुरू केले. यामुळे प्रवाशांना स्थानकावरील स्क्रीनवर गाडीचे लोकेशन, गाडी सुटण्याची प्रत्यक्ष वेळ आणि गाडी रद्द झाल्याची माहिती मिळेल, असा गाजावाजा एसटीने केला होता. त्यासाठी प्रत्येक बस स्थानकावर 

एक नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला. त्यात मोठ्या स्क्रीनवर या गाड्यांना ट्रॅक केले जाते. त्यानंतर त्याचे अपडेट बसस्थानकांतील स्क्रीनवर दिसणे अपेक्षित आहे; मात्र अद्याप स्क्रीनवर माहिती दाखवली जात नसल्याने प्रवासी संतप्त  झाले आहेत.  

आश्‍चर्य म्हणजे, याबाबत बस स्थानकांवरील चौकशी केंद्रातील अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ‘व्हीटीएस’ प्रणालीबाबत काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. एसटीचे वेळापत्रक कोलमडले तरी कोणतीही तक्रारी न करता बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे अनेक प्रवासी सांगतात.

प्रवाशांना अद्ययावत सुविधा देण्याचा एसटीचा उद्देश आहे; मात्र गाड्यांची माहिती टीव्ही स्क्रीनवर दाखवली जात नसल्यास त्याची माहिती घेऊन त्यात सुधारणा केल्या जातील.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com