एसटी कामगारांचा संपाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई - सातवा वेतन आयोग लागू करावा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, आदी मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने लग्नसराईचे दिवस संपल्यावर, 15 मे नंतर कधीही संपावर जाण्याचा निर्धार महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने रविवारी सांगलीत झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात केला. 

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून वर्षभरापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठका झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या अधिवेशनात संपावर जाण्याचा ठराव संमत करण्यात आला. 

सध्या राज्यभरात लग्नसराई सुरू आहे. यादरम्यान संपाचे हत्यार उपसल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल. तसेच प्रशासनाला नियमानुसार किमान 15 दिवस अगोदर संपाची पूर्वकल्पना देणे आवश्‍यक असते. त्यामुळे 15 मे नंतर कधीही आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, असे संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी सांगितले. 

Web Title: ST workers strike sign