आज मध्यरात्रीपासून पुन्हा टोलवसुली सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेला चलन तुटवडा व त्यावरून टोल नाक्‍यावर उडणारा गोंधळ रोखण्यासाठी करण्यात आलेली टोलवसुली बंदी उद्या (ता. 24) मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहे.

मुंबई - नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेला चलन तुटवडा व त्यावरून टोल नाक्‍यावर उडणारा गोंधळ रोखण्यासाठी करण्यात आलेली टोलवसुली बंदी उद्या (ता. 24) मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी जाहीर केला. त्यानंतर नऊ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील सर्व टोलनाक्‍यांवर सुटे पैसे आणि जुन्या नोटांबाबत भांडणांची परिस्थित निर्माण झाली. नवीन चलनाचा तुटवडा लक्षात घेता केंद्र सरकारने सुरवातीला देशात नऊ तारखेपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत टोलबंदी लागू केली होती. त्यानंतर त्याला 24 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळे नागरिकांत असलेला रोष काहीसा हलका झाला होता.

मात्र, उद्या मध्यरात्रीपासून पुन्हा टोलवसुली सुरू होत असल्याने वाहतूक कोंडी व सुट्या चलनाचा पेच कायम राहण्याची शक्‍यता आहे.

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे 27 तर राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे 26 टोल नाके आहेत. या सर्वांवर उद्यापासून वसुली सुरू होण्याची शक्‍यता आहे. नवीन चलनाचा तुटवडा लक्षात घेता जुन्या नोटा पेट्रोल पंपांवर स्वीकारण्यासाठीही 24 नोव्हेंबरपर्यंत सरकारने मुदत दिली होती. ही मुदतही उद्या संपत असून उद्या मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपांवर जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.

नाक्‍यांचे जाळे
27 सार्वजनिक बांधकाम विभागाचे
26 रस्ते वाहतूक मंडळाचे

Web Title: Start again from midnight today toll recovery