राज्यात अडीच हजार कोटींची तूरखरेदी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई - राज्यातील तूरखरेदीच्या प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल झाला असला तरी राज्य व केंद्र सरकारने आजपर्यंत तब्बल 2 हजार 525 कोटी 23 लाख रुपयांची तूरखरेदी केली आहे. 

मुंबई - राज्यातील तूरखरेदीच्या प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल झाला असला तरी राज्य व केंद्र सरकारने आजपर्यंत तब्बल 2 हजार 525 कोटी 23 लाख रुपयांची तूरखरेदी केली आहे. 

केंद्र सरकारने यंदासाठी तुरीचा एफआरपी दर 5 हजार 50 रुपये प्रतिक्‍विंटल जाहीर केला होता. 15 डिसेंबर 2016 ते 22 एप्रिल 2017 या कालावधीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची तूर व्यापाऱ्यांनी साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराने खरेदी करून हिच तूर नंतर राज्य सरकारला 5 हजार 50 रुपये किमतीने विकण्यात आली. वास्तविक पाहता एपीएमसीच्या कायद्यानुसार तुरीचा लिलाव न करताच ठोक किमतीत तूरखरेदी करून व्यापाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. राज्यात यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने तीन वेळा खरेदीची मुदत वाढवून दिली. या तीन टप्प्यांत केंद्र व राज्य सरकारने 5050 रुपये क्‍विंटल दराने शेतकऱ्यांची तूर खरेदी केली. तरीही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांकडे किमान 10 लाख क्‍विंटल तूर शिल्लक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: The state is estimated to be worth Rs 2,50,000 crore