राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील सर्व श्रेणीतील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारतर्फे घेण्यात आला. यामुळे वर्षाला तिजोरीवर साडेतीन हजार कोटींचा भार पडणार आसल्याचे सांगण्यात येते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आसला तरीही राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांना मात्र आजपर्यत सहाव्या वेतन आयोगाच्या तरतुदीतील महागाई भत्त्याच्या फरकासाठी तिष्ठत राहावे लागत होते.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे महागाई भत्त्याची 7 टक्के इतकी भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज वित्त विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. यामुळे राज्यातील 19 लाख कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. ही वाढ 1 जुलै 2016 पासून लागू होणार आहे. यानुसार फरकाची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

Web Title: state government employee dearness allowance 7% increase