राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 20 ऑगस्टला संप

Strike
Strike

मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती; परंतु मागण्यांची पूर्तता झाली नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटना 20 ऑगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप करणार आहेत.

राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर गेल्या वर्षी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली होती. 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु प्रत्यक्षात सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भत्ते न देता जुन्या दराने दिले जात असल्याचा आरोप राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी केला असून, पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com