Breaking : MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली; आता 'या' तारखेला होणार परीक्षा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

गेल्या रविवारी (ता.१५) सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात आली. त्यामुळे आता काय होणार या विचारात विद्यार्थी होते.

Coronavirus : मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जनता कर्फ्यू ३१ मार्चपर्यंत वाढविला. कोरोनाला वेळीच आळा घालण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम होण्यास सुरवात झाली. याची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आयोगाने एक परिपत्रक जारी करत याची घोषणा केली. ५ एप्रिलला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आणि ३ मेला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

- Videos : 'वी आर वन, वी हॅव वॉन'; कोरोना योद्ध्यांना दिग्गजांचे अभिवादन!

दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याचे दिसताच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकल्याची मागणी केली होती. मात्र, परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होतील, अशी भूमिका सुरवातीला घेतली होती. त्यानंतर काही परीक्षांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. मात्र, आता दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- Coronavirus : 'जनता कर्फ्यू'नंतर पंतप्रधानांचे नवे आवाहन; वाचा सविस्तर!

एमपीएससीची पूर्वपरीक्षा आठवड्यावर येऊन ठेपली होती. मात्र, निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या धास्तीने आधीच घर गाठले होते. त्यात रेल्वे, एसटी या प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोरोनामुळे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

- बुलाती है मगर जाने का नै, ये दुनिया है, इधर जाने का नै!

गेल्या रविवारी (ता.१५) सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात आली. त्यामुळे आता काय होणार या विचारात विद्यार्थी होते. मात्र, परीक्षा पुढे ढकलत राज्यसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government has decided to postpone MPSC prelims exam due to Coronavirus