राज्य सरकारने सुरू केलेले महापोर्टल बंद करा - सुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

शासकीय नोकरभरतीसाठी राज्य सरकारने सुरू केलेले ‘महापोर्टल’ बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. महापोर्टलमुळे नोकरभरतीत गैरव्यवहार होत असून, परीक्षापद्धतीत पारदर्शकता नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मुंबई - शासकीय नोकरभरतीसाठी राज्य सरकारने सुरू केलेले ‘महापोर्टल’ बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. महापोर्टलमुळे नोकरभरतीत गैरव्यवहार होत असून, परीक्षापद्धतीत पारदर्शकता नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सुप्रिया सुळे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शासकीय नोकरभरती करताना पारदर्शकता राहावी, ऑनलाइन अर्ज करता यावा, यासाठी यापूर्वीच्या राज्य सरकारने महासेवा पोर्टल सुरू केले होते. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी हजारो इच्छुक उमेदवारांनी केल्या होत्या. अनेक युवकांनी आपल्याला भेटून महापोर्टल बंद करण्याची मागणी केल्याचे सुळे यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संस्थगित; 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग हवा
दिव्यांगांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्र विभाग निर्माण करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात पाच ते सहा टक्‍के लोकसंख्या दिव्यांग आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ‘दिव्यांग कल्याण आयुक्‍तालय’ स्थापन झालेले नाही, असे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government Mahaportal close demand by supriya sule