राज्यात जिल्हा बंदीला आणखी काही काळ बंदीच; 'हे' आहे कारण

संभाजी पाटील
Sunday, 26 July 2020

राज्य सरकारकडून लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील उद्योग, व्यापार, दुकाने सुरू राहावीत, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. उद्योग आणि दुकाने सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली, मात्र अद्यापही जिल्हाबंदी उठवण्यात बाबत राज्यशासन सकारात्मक नाही. शहरी भागातून ग्रामीण भागात होणारा संसर्ग टाळावा, यासाठी पहिल्या लाॅकडाउन पासून राज्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे.

पुणे : शहरातून ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात आणखीन काही महिने जिल्हाबंदी कायम ठेवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे एक ऑगस्टनंतर जिल्हाबंदी उठवण्याची शक्यता पुन्हा एकदा मावळली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारकडून लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील उद्योग, व्यापार, दुकाने सुरू राहावीत, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. उद्योग आणि दुकाने सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली, मात्र अद्यापही जिल्हाबंदी उठवण्यात बाबत राज्यशासन सकारात्मक नाही. शहरी भागातून ग्रामीण भागात होणारा संसर्ग टाळावा, यासाठी पहिल्या लाॅकडाउन पासून राज्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या केवळ शेतीमाल, औद्योगिक तसेच इतर माल वाहतुकीला परवानगी आहे. नागरिकांना मात्र अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी अद्यापही पोलिसांचा पास आवश्यक आहे. एसटी सेवाही अद्याप जिल्हांतर्गत सुरू ठेवण्यात आली आहे. 

सरकारने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गतही 'उडान' विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यवहार सुरळीत होण्यासाठी जिल्हाबंदी उठवावी, अशी मागणी गेली दोन महिन्यांपासून होत आहे. मात्र 'अनलॉक' नंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांतून नागरिक आपल्या मूळ गावी गेल्याने यापूर्वीही मोठ्याप्रमाणावर संसर्ग वाढला आहे. अद्यापही मुंबई-पुण्यातून लोक आपल्या मूळ गावी कोणते ना कोणते कारण काढून जात असून,  आपल्या गावी संसर्ग देत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्यात आणखी काही महिने जिल्हाबंदी उठवण्याची शक्यता नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. 

'आरटीई'ला बसला कोरोनाचा फटका; फक्त १४ टक्के प्रवेश झाले निश्चित!

"जिल्हाबंदी उठल्यास शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर आपल्या मूळगावी जाण्याचा प्रयत्न करतील आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग पसरेल. त्यामुळे सध्यातरी जिल्हाबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. सणांच्या काळामध्ये नागरिकांची ये-जा वाढते. सध्याची रुग्ण संख्या पाहता हा धोका पत्करता येणार नाही." - - अनिल देशमुख, गृहमंत्री

पुण्यातील 'या' दुर्लक्षित लेणीतील शिलालेखाचे गूढ कायम!

अशी आहे रुग्ण संख्या (२६जुलै सकाळ पर्यंत)

राज्यातील एकूण रुग्ण संख्या : 357117

सक्रिय रुग्णांची संख्या : 199967

एकूण मृत्यू : 13132.

मृत्युदर: 3.68%
Image may contain: text that says "Nandurbar A Jalgaon Covid-19 Cases in Maharashtra- 25th July 2020 Bhandara Dhule Akola Nashik Amravati Nagpur Buldana Washim Gondia Palghar 13543 Thane 83189 106980 Pune Wardha Yavatmal Chandra Aurangabad Ahmednagar Mumba? Raigad 20Hingoli Gadchiroli Parbhani Nanded Satara Ratnagiri, 2862 Solapur Sangli Kolhapur Osmanabad Total Cases: 357117 Active Cases: 143714 Cured/Discharged/Migrated 199967 Death: 13132 Legend Total Tests: 1840445 Total tests 24 49835 Sindhudurg Source: MEDD Report 25July, 2020) Govementof Maharashtra Cases Numbers Total Cases Prepared.by Mumbai"

पुण्यात 'या' महाविद्यालयांचे हाॅस्टेल झाले 'क्वारंटाईन सेंटर...

राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या

- पुणे : 43838

- ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर आदी : 37162

- मुंबई महापालिका : 22443

- पालघर वाशी विरार : 5502

- रायगड पनवेल :  5286

- नाशिक जिल्हा:  4853

- औरंगाबाद जिल्हा :  4776

- सोलापूर जिल्हा : 3487

- कोल्हापूर : 2141

- सातारा:  1185

- सांगली:  598

- अहमदनगर : 1388

- सिंधुदुर्ग : 54

- वर्धा : 56

- भंडारा :  28

- गोंदिया : 20
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government plans to maintain the district closure for a few more months due to corona outbreak