पैसे नाहीत म्हणत मराठा आरक्षणाची केस चालवणाऱ्या रोहतगींना सरकारने हटवले

वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे मराठा आरक्षण केस चालवणा-या मुकूल रोहतगी यांना महाराष्ट्र सरकारने हटवले आहे. महागडे वकील असल्याचं कारण सरकारनं दिले असून मुकुल रोहतगी यांची फी सरकारला परवडत नसल्याचे कारण महाराष्ट्र सरकारने दिले आहे.

मुंबई : राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे मराठा आरक्षण केस चालवणा-या मुकूल रोहतगी यांना महाराष्ट्र सरकारने हटवले आहे. महागडे वकील असल्याचं कारण सरकारनं दिले असून मुकुल रोहतगी यांची फी सरकारला परवडत नसल्याचे कारण महाराष्ट्र सरकारने दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वोच्च न्यायालयात आज (ता.१८)च्या आरक्षण सुनावणीवर परिणाम झाला असून खासदार संभाजीराजे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून स्पष्ट शब्दांत नाराजी कळविली आहे. 

मराठा आरक्षणाची बाजू रोहतगी मांडणार

दरम्यान, ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांच्या बचावासाठी मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली होती. त्यावेळीही मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात घुसखोरी केली असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. 

Image result for Mukul rohatagi esakal"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State government removed Rohtagi, who runs a Maratha reservation case