राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले : फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नगर - भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्यामुळे राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण नऊ टक्‍क्‍यांवरून 52 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. यापुढे पोलिसांच्या कामात आणखी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. 

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ""पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशाच सुसज्ज इमारतींची आवश्‍यकता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण खाली गेले होते. ते आता 52 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाणही 32 टक्‍क्‍यांवर गेले आहे. एका वर्षात राज्यात "सीसीटीव्हीएनएस' पद्धत कार्यान्वित केली. त्यामुळे गुन्हेगारांचे ऑनलाइन रेकॉर्ड तयार होत आहे. "ई-तक्रार ऍप' पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. त्याची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येईल.'' 

पन्नास दिवसांचा त्रास हीच खरी देशभक्ती 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरुद्ध सुरू केलेल्या लढाईला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन करून, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ""आज त्रास होईल; पण उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे. क्रांतिकारी निर्णयामुळे देशातील दहशतवादी, नक्षलवाद्यांना उपाशी मरण्याची वेळ आली आहे. देशातील काळा पैसा संपवायचा असेल, तर पन्नास दिवस त्रास सहन करा. हीच खरी देशभक्ती आहे.'' 

Web Title: The state increased crime to prove