राज्याच्या मंत्रिमंडळात ‘घड्याळा’चा वरचष्मा

संजय मिस्कीन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देताना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मंत्रिपदे पारड्यात पाडून घेण्यात यश मिळविले आहे. ४३ जणांच्या मंत्रिमंडळात या पक्षाला सर्वाधिक १६ मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्रिपदाचाही समावेश राहणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह पंधरा मंत्रिपदे मिळणार आहेत. काँग्रेसला बारा मंत्रिपदांवर समाधान मानावे लागणार असून, विधानसभा अध्यक्षपद अगोदरच या पक्षाला देण्यात आले आहे.

‘राष्ट्रवादी’ १६, शिवसेना १५, काँग्रेसला १२ पदे?
मुंबई - शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देताना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मंत्रिपदे पारड्यात पाडून घेण्यात यश मिळविले आहे. ४३ जणांच्या मंत्रिमंडळात या पक्षाला सर्वाधिक १६ मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्रिपदाचाही समावेश राहणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह पंधरा मंत्रिपदे मिळणार आहेत. काँग्रेसला बारा मंत्रिपदांवर समाधान मानावे लागणार असून, विधानसभा अध्यक्षपद अगोदरच या पक्षाला देण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्रिपदासह ४३ मंत्रिपदे असतात. महाविकास आघाडीतला शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, मंत्रिपदाच्या वाटपात ‘राष्ट्रवादी’ने १६ पदे मिळवली आहेत. २००४ मधे ‘राष्ट्रवादी’च्या जागा सर्वाधिक असताना काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्या बदल्यात महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे ‘राष्ट्रवादी’ने पदरात पाडून घेतली होती. त्याच धर्तीवर आता शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने अधिकची मंत्रिपदे ‘राष्ट्रवादी’ने पटकावली आहेत.

आणखी वाचा :  मनसे आमदार उद्धव ठाकरेंना म्हणतात, ‘आता ‘U’ ‘T’urn नको!’

या सोळापैकी दहा कॅबिनेट व सहा राज्यमंत्रिपदे असतील, असे सांगण्यात येते. शिवसेनेकडे १२ कॅबिनेट व तीन राज्यमंत्रिपदे राहतील, असा दावा करण्यात येत असून, काँग्रेसला आठ कॅबिनेट व चार राज्यमंत्रिपदे मिळतील, असा सूत्रांचा दावा आहे.

शरद पवारांनी सांगितलं, अजित पवार भाजपसोबत का गेले?

‘राष्ट्रवादी’कडे उप-मुख्यमंत्रिपदासह गृह व अर्थ हे महत्त्वाचे विभाग येण्याचे संकेत आहेत. कृषी, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, रस्तेविकास महामंडळ, परिवहन यासारखे विभाग शिवसेना स्वत:कडे राखणार ठेवणार आहे. काँग्रेसला महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय व आदिवासी विकास ही मंत्रिपदे मिळू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state mantrimandal ncp shivsena congress politics