राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची  प्राथमिक फेरी रंगणार साहित्य संघात 

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची  प्राथमिक फेरी रंगणार साहित्य संघात 

मुंबई - राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या 58 व्या वर्षी एकूण 23 नाटके सादर केली जाणार असून, प्राथमिक फेरी गिरगाव येथील साहित्य संघात होणार आहे. 19 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत रोज सायंकाळी 7 वाजता, 8 डिसेंबरला दुपारी 4 वाजता आणि 10 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत सकाळी 11.30 वाजता नाटके होतील. 

19 नोव्हेंबरला अमृत नाट्य भारती हौशी विंग संस्थेतर्फे "शलाका' नाटक सादर होईल. या नाटकाचे लेखक रमेश कोटस्थाने आणि दिग्दर्शक सुहास वीरकर आहेत. 20 नोव्हेंबरला अर्क आर्ट ट्रस्टतर्फे पु. ल. देशपांडे यांचे "एक झुंज वाऱ्याशी' नाटक सादर केले जाईल. या नाटकाचे दिग्दर्शन शिरीष ठाकूर यांनी केले आहे. 21 नोव्हेंबरला बेस्ट कला आणि क्रीडा मंडळातर्फे "सिक्‍स्टी थ्री' हे नाटक सादर होईल. या नाटकाचे लेखक विक्रांत मोडक आणि दिग्दर्शक गणेश भिडे आहेत. 22 नोव्हेंबरला हर्षद माने फाऊंडेशनतर्फे किशोर नार्वेकर यांचे "खंडणी' हे नाटक सादर केले जाईल. 

23 नोव्हेंबरला लोकायन सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ. मोनिका ठक्कर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या "कायनी दोस्त' या नाटकाचा प्रयोग होईल. 24 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या महानायक फाऊंडेशनतर्फे ऋणेश तांबे यांचे लेखन-दिग्दर्शन असलेले "मी शोधलेला देव' हे नाटक सादर होईल. 26 नोव्हेंबरला मोहिनी आर्ट अकॅडमीतर्फे रवींद्र वाडकर यांनी लिहिलेले व दिग्दर्शित केलेले "26-52 उन्हापावसाची बेरीज वजाबाकी' हे नाटक रसिकांना पाहता येईल. 

27 नोव्हेंबरला मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस क्‍लबच्या वतीने "व्याकरण' या नाटकाचा प्रयोग होईल. प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सुधाकर कानडे यांनी केले आहे. 29 नोव्हेंबरला ऋतुरंग थिएटरच्या वतीने विजयकुमार राख यांचे "एक खटल्याची साक्ष' हे नाटक सादर होईल. 30 नोव्हेंबरला शिवराम रानडेलिखित "रिइनकार्नेशन' या नाटकाचा प्रयोग होईल. 

डिसेंबरमध्ये 
1 डिसेंबर : "त्रिकूंचा दाहिदिइत' (ज्ञानेश महाराव), 2 डिसेंबर : "बायकांना का नाही..? (राजेश कोळंबकर), 4 डिसेंबर : "रंगा रंगी रंगला' (अशोक पालवे), 5 डिसेंबर : "शेवटचा पर्याय' (आनंद म्हापसेकर), 6 डिसेंबर : "भू-भू' (प्रशांत निगडे), 7 डिसेंबर : "हॉट स्पॉट' (चेतक घेगडमल), 8 डिसेंबर : "बुद्धिबळ आणि झब्बू' (चं. प्र. देशपांडे), 10 डिसेंबर : "चंगलपट' (रमाकांत वाघमोडे), 11 डिसेंबर : "एक रुपया' (नितीन भारद्वाज), 13 डिसेंबर : "फेंट' (चैतन्य देशपांडे), 14 डिसेंबर : "सलवा जुडूम' (इरफान मुजावर), 14 डिसेंबर : "ताजमहालाचे उद्‌घाटन' (अजय शुक्‍ला), 15 डिसेंबर : "चौथा स्तंभ' (अमोल सूर्यवंशी). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com