आंदोलनामुळे राज्य परिवहनचे 28 लाखांचे नुकसान

तात्या लांडगे 
रविवार, 22 जुलै 2018

सोलापूर: पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, माळशिरस या तालुक्‍यांसह अन्य ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहनच्या 50 एसटी बसेसवर दगडफेक केली तर उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा येथे एसटी बसच पेटविण्यात आली. त्यामुळे राज्य परिवहनच्या सोलापूर विभागाच्या बसेसचे सुमारे 28 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सोलापूर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील असो की कोणत्याही समाजाच्या विविध मागण्या व हक्‍कांसाठी होणारी अथवा एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलने असो...सर्वप्रथम राज्य परिवहनच्या एसटी बसेसलाच टार्गेट करण्यात येते. खेड्या-पाड्यातील सर्वसामान्यांसह सर्वच घटकांना सुरक्षित प्रवाससेवा देणाऱ्या लालपरीचा अगोदरच तोट्यामुळे खडतर प्रवास सुरु आहे. राज्यातील बहुतांशी खेड्या-पाड्यात वाहतुकीची साधने अपुरी असल्यापासून लालपरी अखंडितपणे सेवा बजावत आहे. कोणत्याही आंदोलनावेळी राज्य परिवहन विभागाकडून तत्काळ कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. 

लाखो रुपयांच्या नुकसानीनंतर राज्य परिवहनला जाग येते, असे प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित होत आहेत. मराठा व धनगर समाजाने आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर सुरु केलेल्या आंदोलनाच्या तीन दिवसात सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी एसटी बसेसचे नुकसान झाले आहे. त्याबाबतचा अहवाल सरकारला पाठविण्यात आल्याचेही विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी, या उद्देशाने राज्य परिवहनची सेवा सुरुच ठेवण्यात आली आहे. बार्शी, मंगळवेढा या मार्गावरील एसटीसेवा बंद ठेवण्यात आली होती. तसेच ज्या-ज्या मार्गांवर एसटी बसेसची तोडफोड झाली आहे, त्याठिकाणी मात्र पोलीसांच्या सूचनेनुसारच गाड्या सोडल्या जात असल्याचे सोलूापर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: State Transport 28 lakhs loss due to agitation