राज्य परिवहनची नवी शक्‍कल

तात्या लांडगे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

लालपरीचे नुकसान टाळण्याकरिता आता काचेला संरक्षण
सोलापूर - आंदोलनदरम्यान एसटी बसचे नुकसान टाळण्याकरिता राज्य परिवहन विभागाने नवी शक्‍कल लढविली आहे. आंदोलनात होणारी एसटी बसच्या काचेची तोडफोड रोखण्याकरिता गाड्यांना लोखंडी जाळ्या बसविण्याच्या सूचना वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या.

आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका लालपरीलाच बसला असून, आतापर्यंत राज्यभरात सुमारे साडेचारशे बसची तोडफोड झाली आहे; तसेच अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्याने आतापर्यंत सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. उद्याच्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी राज्यातील सर्व विभागात विभागप्रमुख, आगारप्रमुख, पोलिस यांच्या बैठका पार पडल्या. राज्य परिवहनच्या दररोज चौदाशे मार्गांवरून एक लाख 4 हजार फेऱ्या होतात. या नव्या क्‍लृप्तीमुळे बहुतांशी प्रमाणात नुकसान टळेल, असा विश्‍वास परिवहनमंत्र्यांनी व्यक्‍त केला आहे.

वाहतूक महाव्यवस्थापकांच्या सूचना
- विभागस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा
- पोलिसांच्या मदतीने व त्यांच्या परवानगीनचे बसेस सोडाव्यात
- संप, आंदोलन काळात बसना लोखंडी जाळ्या बसवाव्यात
- बसच्या नुकसानीचे व्हिडिओ चित्रीकरण करावे
- वाहतूक विस्कळित झाल्यास पोस्ट, टेलिग्राम विभागाला त्याची माहिती द्यावी
- फेऱ्या रद्द झाल्यास आरक्षित तिकिटांचा परतावा द्यावा
- चालकाने बस सोडून इतरत्र जाऊ नये
- दर दोन तासाला आंदोलनाच्या स्थितीची माहिती द्या

Web Title: State Transport ST Glass Security