जूनअखेर महाराष्ट्र तहानलेलाच

जूनअखेर महाराष्ट्र तहानलेलाच

पुणे -  नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा केरळ किनारपट्टीवर उशिरा दाखल झाल्याने जूनअखेर महाराष्ट्र तहानलेलाच असल्याचे चित्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. राज्यात जूनच्या सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात १ ते ३० जून यादरम्यान सरासरी २०७.६ मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी मात्र मॉन्सून केरळमध्येच उशिरा दाखल झाला. त्यानंतर ‘वायू’ चक्रीवादळ आले. त्यामुळे मॉन्सूनचा दक्षिण कर्नाटकमध्येच बरेच दिवस मुक्काम राहिला. या सर्वांचा परिणाम म्हणून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास उशीर झाला. पूर्वमोसमी पावसानेही हुलकावणी दिली. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यात जूनमध्ये जेमतेम १५५.३ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस २५ टक्के कमी असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे हवामान विभाग आहेत. यापैकी कोकणात सरासरीच्या तुलनेत उणे १९ ते १९ टक्के पाऊस पडला. उर्वरित विभागांत पावसाने दडी मारल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

मध्य महाराष्ट्र 
पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होणाऱ्या मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के पाऊस कमी पडला. यंदा १२३.३ मि.मी. पाऊस झाला.

कोकण
कोकणात मॉन्सून दाखल झाल्यानंतर जोर धरला. या महिन्यात सरासरी ६८९.७ मि.मी. पाऊस पडतो. या वर्षी ६४२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तो सरासरीपेक्षा ७ टक्के कमी आहे.

मराठवाडा
संपूर्ण मराठवाडा गेल्या वर्षभरापासून दुष्काळात होरपळत आहे. तेथे सरासरीच्या (१३८ मि.मी.) फक्त ९२.३ मि.मी. पाऊस म्हणजे उणे ३३ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

विदर्भ
विदर्भात यंदा सरासरीच्या (१७० मि.मी.) तुलनेत ९१ मिलिमीटर पाऊस पडला. म्हणजे तब्बल ४७ मि.मी. कमी पावसाची नोंद या महिन्यात विदर्भात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com