esakal | महिला आयोग अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे? विद्या चव्हाण, रूपाली चाकणकर यांची नावे आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

महिला आयोग अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास कुणाची वर्णी?

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

महिला आयोग अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास कुणाची वर्णी?

sakal_logo
By
दीपा कदम

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. गेले २० महिने रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार विद्या चव्हाण, पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांच्या नावावर चर्चा सुरु असल्याचे समजते. त्यामुळेच काँग्रेसने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या नावाची केलेली शिफारस मागे पडली आहे.

राज्यात लॉकडाउननंतर महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचारात वाढ झालेली आहे. त्यातच अंधेरी येथील साकिनाका भागात एका महिलेवर बलात्कारानंतर झालेल्या मारहाणीत पीडितेचा मत्यू झाल्याने महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की महिला आयोगाला लवकरात लवकर अध्यक्ष मिळावा असे पत्र यापूर्वीच लिहिलेले आहे.

हेही वाचा: रोहित पवार उभारतायत देशातला सर्वात उंच 'स्वराज्य ध्वज'

चाकणकर, अय्यंगार यांची वर्णी?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला आयागोच्या अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती व्हावी याकडे अधिक कल आहे. महिलांच्या प्रश्नांवर गेली २५ वर्षे काम करणाऱ्या, मुंबईतील झोपडपट्टीच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या म्हणून विद्या चव्हाण यांची ओळख आहे. रूपाली चाकणकर यांनी खूप कमी कालावधीत पक्षाच्या महिला आघाडीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव म्हणून काम केलेले आहे.

loading image
go to top