एसटी वाचविण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालय - सार्वजनिक वाहतुकीला बळ देणाऱ्या एसटीला वाचविण्यासाठी आंदोलन करताना विविध संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते.
जिल्हाधिकारी कार्यालय - सार्वजनिक वाहतुकीला बळ देणाऱ्या एसटीला वाचविण्यासाठी आंदोलन करताना विविध संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते.

पुणे - एसटीच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असून, सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला वाचविण्याची गरज आहे. त्यासाठी पुण्यासह चार जिल्ह्यांत झालेले आंदोलन आता राज्यव्यापी करणार आहे. त्यासाठी २५ डिसेंबरला पुण्यात साने गुरुजी शाळेत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुरोगामी पक्ष संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली.

दरम्यान, सार्वजनिक वाहतुकीला बळ देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पुरोगामी पक्ष संघटना संयुक्त कृती समितीच्या आंदोलनात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ‘‘महामार्गांवरील टोल नाक्‍यांवर १५ डिसेंबरपासून वाहनांना फास्ट टॅग लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. एसटी सरकारी महामंडळाच्या मालकीची संस्था असूनही टोल बंधनकारक आहे. एसटीच्या खासगीकरणाचे हे छुपे धोरण मोडीत काढून एसटीचा विस्तार केला पाहिजे,’’ असे मत पवार यांनी व्यक्‍त केले.

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर म्हणाले, ‘‘आमदार-खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्यांना टोल माफ आहे. मात्र, सामान्य माणूस प्रवास करत असलेल्या एसटीला टोल द्यावा लागतो, ही बाब संतापजनक आहे.’’  

विजय कांबळे, ॲड. मोहन वाडेकर, विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार मोरे, महिला प्रतिनिधी उषा नेटके, अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेचे दादासाहेब सोनवणे, गणेश भालेराव, वैरागर यांनी मनोगत व्यक्त केले. सहनिमंत्रक नीलेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना एसटी सक्षम करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com