प्लॅस्टिक बंदी कारवाई अधिक तीव्र 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

मुंबई : राज्यभर प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठीची मोहीम अधिक तीव्र केली असून, आतापर्यंत 800 टन प्लॅस्टिक जप्त करून 3 कोटी रुपये दंड वसूल केल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.

मुंबई : राज्यभर प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठीची मोहीम अधिक तीव्र केली असून, आतापर्यंत 800 टन प्लॅस्टिक जप्त करून 3 कोटी रुपये दंड वसूल केल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.

प्लॅस्टिक बंदीसंदर्भात मंत्रालयात आज बैठक झाली. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. हा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानात मालाची विक्री करताना पॅकेजिंग मटेरिअल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. असे प्लॅस्टिक आवरण नष्ट केले जात नाही अथवा त्याचे रिसायकलिंग केले जात नाही. त्यासाठी असे मटेरिअल एकत्रपणे गोळा करून त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांची आहे. अशा दुकानदारांनी योग्य पद्धतीने प्लॅस्टिकची विल्हेवाट लावली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. 

Web Title: The statewide plan for the implementation of plastic ban was much more intense