शिवशाही बसवर दगडफेक; संपाला हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषीत संपाला हिंसक वळण लागले आहे. दापोली मुंबई शिवशाही बस मंडणगड मार्गावरील पिसई येथे अज्ञात इसमाने दगडफेक केली. काल पोलिस बंदोबस्तात परळ येथून बस रवाना करताना संतप्त कर्मचाऱ्यांनी चालकावर हल्ला केला होता, तर आज शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आल्या आहेत.

दापोली आगारातील गाडी क्र MH04JK 1270 दापोली मुंबई शिवशाही बसवर दापोली पासून 18 किमी असणाऱ्या पिसई येथे अज्ञात व्यक्तीने सव्वाबाराच्या सुमारास गाडीवर दगड मारल्याने पुढिल काच फुटली आहे. यामध्ये कोणीही प्रवासी जखमी झाला नसून गाडीच्या समोरच्या काचेचे नुकसान झाले आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषीत केली. ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी महामंडळाकडे 9 जून 2018 पर्यंत लेखी स्वरूपात अर्ज भरावा व असा अर्ज स्विकारताना चित्रिकरण होणार असल्याने एसटी महामंडळाच्या कर्माचाऱ्यांमध्ये खदखद आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वतीने सोशल मीडियात संपाची हाक देत महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शुक्रवारी मध्यरात्री पासून सुरू असलेल्या अघोषीत संपामुळे व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. एसटी व्यवस्थापनाने कर्माचाऱ्यांवर निलबंनाची कार्यवाहीही सौम्य केली असून संपावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापनाची बैठक सुरू आहे.

1 जून रोजी घोषित केलेली वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मान्य नसेल तर ती रद्द करण्यात यावी आणि औद्योगिक न्यायालय जो निर्णय घेईल तो कर्मचाऱ्यांनी मान्य करावा. कर्मचाऱ्यांनी जर हा निर्णय मान्य केल्यास 1 जून रोजी केलेली वेतनवाढ रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एस टीची संभाव्य भाडेवाढ देखील कमीत कमी करणे शक्य होईल असा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या वतीने दिवाकर रावते यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

Web Title: stone pelting on shivshahi bus at mandangad