बाजार समितीत जाणारा माल रोखणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

"सर्वप्रथम किसान क्रांती जनआंदोलन'ने शेतकरी संपाची हाक दिली. इतरांचा संपाशी संबंध नाही. शेतकऱ्यांचा पुळका असणाऱ्यांनी शेतकरी म्हणून संपात सहभागी व्हावे. येत्या मंगळवारपासून (ता. 5) शेतकरी संपाची तीव्रता वाढविणार असून, गुरुवारपासून बाजार समितीत जाणारा माल थांबविणार आहोत,'' अशी माहिती किसान क्रांती जनआंदोलनाच्या नेत्या ऍड. कमल सावंत यांनी दिली. 

नगर : "सर्वप्रथम किसान क्रांती जनआंदोलन'ने शेतकरी संपाची हाक दिली. इतरांचा संपाशी संबंध नाही. शेतकऱ्यांचा पुळका असणाऱ्यांनी शेतकरी म्हणून संपात सहभागी व्हावे. येत्या मंगळवारपासून (ता. 5) शेतकरी संपाची तीव्रता वाढविणार असून, गुरुवारपासून बाजार समितीत जाणारा माल थांबविणार आहोत,'' अशी माहिती किसान क्रांती जनआंदोलनाच्या नेत्या ऍड. कमल सावंत यांनी दिली. 

शेतकरी संपाबाबत किसान क्रांती जनआंदोलनाची भूमिका मांडताना ऍड. सावंत म्हणाल्या, "गेल्या वर्षी सरकारने काही लोकांना बरोबर घेऊन संप मोडीत काढला. आता तेच लोक पुन्हा संपात सहभागी असल्याचे दाखवीत आहेत. समोर 'लॉंग मार्च' काढायचा आणि मागच्या दाराने समझोता करायचा. मुळात सुकाणू समितीचा संपाशी संबंध नाही. याच लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवायचे नाहीत. त्याऐवजी काहींनी गतवर्षी संपानंतर आपल्या पक्षाचे, संघटनेचे कार्यकर्ते वाढविण्याचे काम केले. आताही संपाला वेगळे वळण देण्याचा आणि शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.'' 

Web Title: To stop the goods going to the market committee