वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - अकोला, जालना आणि बीड जिल्ह्यांत गारपिटीसह झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, डाळिंब यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. केळी, आंबा बागांनाही फटका बसला, तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुणे - अकोला, जालना आणि बीड जिल्ह्यांत गारपिटीसह झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, डाळिंब यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. केळी, आंबा बागांनाही फटका बसला, तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. यामुळे बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहानंतर विदर्भातील अकोला जिल्ह्यातील देवरी, कुटसा (ता. अकोट) येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. अमरावती, बुडाढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांत हलका पाऊस पडला. तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे वादळी वाऱ्यामुळे गहू, केळी या पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात रात्रीच्या दहाच्या सुमारास वीस मिनिटे वादळी पाऊस झाला. या भागात बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या.  राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. थंडीच्या कडाका कमी झाल्यानंतर उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. बीड येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३६ अंशांच्या वर गेले आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. येत्या शनिवारपर्यंत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी वाढणार असल्याने उन्हाचा चटका कायम राहणार आहे. यासह रात्रीच्या किमान तापमानाचा पारा वाढला आहे. आज दुपारीनंतर दोन नंतर बीड, परभणी, हिंगोली, वाशीम, नागपूर, चंद्रपूरसह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या भागांत अंशतः ढगाळ हवामान होते.

Web Title: Storm Rain Hailstorm Agriculture Loss