धनगर समाजाची पुन्हा ताकद दिसली पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनगर समाजाची पुन्हा ताकद दिसली पाहिजे

धनगर समाजाची पुन्हा ताकद दिसली पाहिजे

मुंबई: आपली ताकद पुन्हा एकदा दिसली पाहिजे.. ती दाखवण्यासाठी संख्या दिसली पाहिजे. धनगर समाज आणि आपण सरकार विरोधात आपण काम करत नाही, पण सरकारने आपल्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी धनगर समाजाची पुन्हा एकदा ताकद दिसली पाहिजे, असे आग्रही आवाहन पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी आज मुंबईत केले.

धनगर समाज संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक मुंबईत मुलुंड येथे पार पडली. या बैठकीला समितीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, सचिव हरीश खुजे यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते पुन्हा एकदा समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमुखाने निवड केली. त्यासाठी अड अशोक पुजारी यांनी ठराव मांडला, त्याला समितीचे सचिव हरीश खुजे यांनी अनुमोदन दिले आणि सर्व पदाधिकाऱ्यानी हात वर करून हा ठराव संमत केला.

डॉ. महात्मे यांनी राज्यातील मेंढपाळचे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सुटले पाहिजे.त्यासाठी केवळ तात्पुरते उपाय नको असेही ते म्हणाले. यापूर्वीच्या युती सरकारच्या काळात काढण्यात आलेल्या अनेक जीआर पैकी १३ जीआर मध्ये आपल्याला हव्या त्या शिफारसी मिळाल्या आहेत. समाजाच्या विविध प्रश्नासाठी तेव्हा सरकारने १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली, त्याचा पूर्ण फायदा समाजाला झाला नसला तरी त्यातूनही खूप मोठ्या प्रमाणावर काम झालेले आहे. त्यासाठी आधिक माहिती आणि सुसूत्रता आणून समाजातील अधिकाधिक लोकांना फायदा होईल यासाठी राज्यातील पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधावा असे आवाहनही डॉ. महात्मे यांनी यावेळी केली.

धनगर समाज संघर्ष समितीचे कार्य अधिक जोमाने चालण्यासाठी मेळावे, मोर्चे काढण्याच्या सूचना या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केल्या, त्यावर डॉ. महात्मे यांनी मराठवाड्यात संभाजीनगर येथे मेळावा घेतला पाहिजे, अशी सूचना डॉ. विकास महात्मे यांनी केली. त्यावर मराठवाड्यातील समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा घेण्यासाठी एकमताने मंजुरी देत तो घेण्याची घोषणा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी समितीच्या सर्व सदस्य आणि संपूर्ण महाराष्ट्राला या मेळाव्याचे आमंत्रण देत असल्याची घोषणा केली.

दरम्यान, धनगर समाज आता अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने एकसंघ होत असून या समाजाचे देशातील नेतृत्व माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी करावे अशी मागणी या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली. तर यावेळी अहमदनगरचे नाव पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा ठराव मांडला जावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्यावर कार्यक्रमाच्या अखरेस अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Web Title: Strength Dhangar Community Padmashri Dr Vikas Mahatme Appeal Office Bearers State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :OBC Community