डॉ. खिद्रापुरेविरोधात लवकरच कठोर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - सांगलीतील म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणातील डॉ. खिद्रापुरे याच्याविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असे आश्‍वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी दिले. या प्रकरणी आपण म्हैसाळला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विधान परिषदेत या प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यावर सखोल चौकशी केली जात असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुंडे यांनी दिले. सांगलीतील अवैध गर्भपातप्रकरणी आता 24 तास उलटले आहेत. अजूनही डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला अटक झालेली नाही. पोलिसांची पाच पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. मिरज पोलिसांची तीन पथके आणि गुन्हे विभागाची पथके डॉ. खिद्रापुरे याचा शोध घेत आहेत, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

Web Title: Strict action soon against DR. khidrapure