'सूर्यवंशी मारहाणप्रकरणी कठोर कारवाई करू'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 एप्रिल 2017

मुंबई - 'डीएनए'चे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना शुक्रवारी खारघर येथे केलेल्या जबर मारहणीसंदर्भातील मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित झाला. कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी माहिती घेऊन कठोर कारवाईचा आदेश देण्यात येईल, असे सांगितले. तालिका सभापती अपूर्व हिरे यांनी सरकारने या संदर्भातील माहिती सभागृहाला देण्याचे निर्देश दिले.

विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा विषय विशेष उल्लेखाद्वारे केला. या वेळी गाडगीळ यांनी सूर्यवंशी यांच्यावर आज झालेल्या मारहाणीकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यावर तालिका सभापती अपूर्व हिरे यांनी सरकारने बाब गांभीर्याने घेण्याचे निर्देष सरकारला दिले. डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित घटनेची माहिती घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: strict action suryavanshi beating case