सातवीतील विद्यार्थ्याचा कबड्डी खेळताना मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

शिक्रापूर - पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील नवोदय विद्यालयातील गौरव अमोल वेताळ (वय १४, मूळ गाव न्हावरा, ता. शिरूर) या सातवीतील विद्यार्थ्याचा शाळेअंतर्गत सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत खेळताना मृत्यू झाला. ही घटना ३१ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गौरवच्या कुटुंबीयांना या दुर्घटनेची माहिती घटनेनंतर तब्बल अडीच तासांनी एका चालकामार्फत कळविण्यात आली. या घटनेस नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप वेताळ कुटुंबीयांनी केला आहे. 

नवोदय विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांतर्गत ३१ मार्च रोजी कबड्डी स्पर्धा सुरू होती. सामना सुरू असताना गौरव हा अचानक मैदानात खाली कोसळला. उपस्थित विद्यार्थ्यांना गौरवचे हे पडणे खेळातीलच भाग वाटला; मात्र खूप वेळ तो तसाच पडून राहून तळमळू लागल्याने क्रीडाशिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याची प्रकृती गंभीर वाटल्याने त्याला शिक्रापुरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले. वेताळ परिवाराला रात्री आडेआठच्या सुमारास एका चालकाने फोन करून या घटनेची माहिती दिली. 

या प्रकरणात शाळा प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटल्याने वेताळ परिवाराने शवविच्छेदन शिरूर येथे करण्याचा निर्णय घेतला. गौरवचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. अखेर प्रांताधिकारी भाऊ गलांडे, पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी वेताळ परिवारासह न्हावरे ग्रामस्थांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर रविवारी (ता. १) दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

Web Title: student dies while playing kabaddi shikrapur news