नगरच्या विद्यार्थिनीला मिळाली तब्बल दीड कोटींची शिष्यवृत्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील एका विद्यार्थिनीला तब्बल एक कोटी 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

पारनेर : आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा शिक्षण घेण्यात अडचणी येत असतात. त्यासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते. मात्र, त्याची रक्कम काही हजार रुपये असू शकते. पण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील एका विद्यार्थिनीला तब्बल एक कोटी 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील न्यूजर्सी येथील ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील पळसपूर येथील श्रेया रंगनाथ आहेर या विद्यार्थिनीला ही शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. यातील विशेष बाब म्हणजे देशातील 4 हजार विद्यार्थ्यांमधून श्रेयाने हा मान पटकावला आहे.

मोदी-अमित शहा हा देश तुमच्या बापाचा नाही; काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

श्रेया आहेर ही पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांची कन्या आहे. मुंबईतील नेक्स्टा जिनिअस फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत सर्वच क्षेत्रात विशेष कामगिरी केली. 

Image result for scholarship

पुण्यात शिक्षण

श्रेया आहेर ही विद्यार्थिनी पुण्यातील विश्वशांती गुरूकुल येथे केंब्रिज विद्यापीठाच्या इंटरनॅशनल बेकेलोरेट या अभ्याक्रमाचे शिक्षण घेत आहे.

अनेक उपक्रमात सहभाग

श्रेया आहेरने जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले. तसेच इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग, बाली (इंडोनेशिया), जेकब्स विद्यापीठ ब्रेमेन (जर्मनी) तसेच नगरच्या स्नेहालय येथे इंटरशिप प्रोग्राममधील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student of Parner got Scholarship of Rs One Crore 50 Lakhs