राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल 

राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल 

मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे या पदावर आता मुंबई पोलिस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती देण्यात आली. तसेच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.

जयस्वाल यांची महासंचालकपदी नियुक्ती केली जाईल, असे निश्चित झाले होते. त्यानुसार आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, याबाबत चर्चा सुरु होत्या. या पदासाठी बर्वे यांच्यासह अप्पर पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमबीर सिंह यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर आज अखेर बर्वे यांना या पदाची सूत्रे सोपविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com