साईबाबा 'त्यांना' सुबुद्धी देवो!: मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

प्रस्ताव येतील तशी मंजुरी 
साईसमाधी शताब्दीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीच्या विकासासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा सरकारने जाहीर केला. मात्र, प्रत्यक्षात निधीची तरतूद झाली नाही. याकडे पत्रकारांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की विकासकामांचे प्रस्ताव येतील तशी त्यांना मंजुरी दिली जाईल. साडेतीन हजार कोटी रुपयांची रक्कम थेट साईबाबा संस्थानच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल, अशी समजूत ठेवू नका. 

शिर्डी : मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी साडेतीन लाख विषारी गोळ्या टाकल्या. याचा अर्थ तेवढे उंदीर मारले असा होत नाही. दुसऱ्यांवर आरोप करताना, जनतेचा आपल्यावरील विश्‍वास उडणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना शनिवारी दिला. तसेच, साईबाबा त्यांना सुबुद्धी देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. 

आज मुनगंटीवार यांनी साईसमाधीचे सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, की समाजसेवकांनी दिल्लीत उपस्थित केलेले सर्व मुद्दे एका क्षणात मार्गी लागणार नाहीत. त्यासाठी वेळ लागेल. सरकारने काही पावले उचलली आहेत. कॉंग्रेस पक्षाने 47 वर्षे 2 महिने व एक दिवस सत्ता उपभोगली. त्यांच्या कार्यकाळात न सुटलेले प्रश्‍न आम्ही केवळ साडेतीन वर्षांत सोडविण्याची अपेक्षा कशी करता येईल. पुढील दहा वर्षांत राज्याची महसुली तूट शून्यावर आणण्याचे आमचे नियोजन आहे. बक्षी आयोगाच्या शिफारशीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग यंदाच लागू केला जाईल. 

प्रस्ताव येतील तशी मंजुरी 
साईसमाधी शताब्दीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीच्या विकासासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा सरकारने जाहीर केला. मात्र, प्रत्यक्षात निधीची तरतूद झाली नाही. याकडे पत्रकारांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की विकासकामांचे प्रस्ताव येतील तशी त्यांना मंजुरी दिली जाईल. साडेतीन हजार कोटी रुपयांची रक्कम थेट साईबाबा संस्थानच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल, अशी समजूत ठेवू नका. 

Web Title: Sudhir Mungantiwar criticize Eknath Khadse rat issue