"तो आम्हाला अक्कल शिकणार..." ; शरद पवारांवर टीका करताना सुधीर मुनगंटीवारांचा तोल घसरला | Sudhir Mungantiwar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhir Mungantiwar

Sudhir Mungantiwar: "तो आम्हाला अक्कल शिकणार..." ; शरद पवारांवर टीका करताना सुधीर मुनगंटीवारांचा तोल घसरला

Sudhir Mungantiwar : भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ऐकेरी उल्लेख केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांचा तोल घसरला आहे. भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. याला मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी आहेत. राष्ट्रवादीत ओबीसी आहेत का? राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का?. छगन भुजबळ स्वत:ला ओबीसी नेते म्हणवतात पण ते कुठे आहेत. सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा घेऊन बसले होते. त्यांना महत्व नाही.

पुढे बोलताना मुनगंटीवार यांचा तोल घसरला. ते म्हणाले, "काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे, तर एक ब्राह्मण आहे. जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षापासून मराठा अध्यक्ष आहेत. मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकणार का? जनतेलाही समजलं पाहिजे मायावी चेहरे घेऊन बसलेल्या लोकांपासून दूर राहावे, त्यांच्यापासून मोठा धोका आहे."