शेतकऱ्यांचे हित जपण्यास आमचे प्राधान्य: सुधीर मुनगंटीवार

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 9 मार्च 2018

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज फी परिपुर्ती योजनेतील उत्पन्न मर्यादा सहा लाखावरून आठ लाख करण्यात आली आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी बसल्या जागेवरून विरोधकांकडून टिप्पणी करण्यात आली. यावर चिडून मुनगंटीवार म्हणाले, ""मराठा समाजासाठी ही उत्पन्न मर्यादा महत्वाची आहे. तिची खिल्ली उडवु नका. अन्यथा पुढच्या वेळेस तुम्हाला जनता निवडून देणार नाही'

मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केले.आज विधानसभेत भाजप शिवसेना युती सरकारचा चौथा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला.

"" परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या युवकांची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांना कौशल विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात सहा कौशल विद्यापिठाची स्थापना करण्यात येणार आहे,'' असे अर्थमंत्री म्हणाले. यावेळी ""खूब करो साहिब कोशिश हमें मिट्टीमें दबाने की, हम बिज है हमे आदत है बार बार उग जाणे की,'' असा हिंदी शेर सादर करत मुनगंटीवार यांनी विरोधकांना चिमटा काढला.

ते पुढे म्हणाले, "प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार आहोत. त्यासाठी 50 कोटी राखून ठेवण्यात येणार आहेत. अण्णासाहेब महामंडळासाठी 50 कोटीवरून 400 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 100 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी 36 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे'. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज फी परिपुर्ती योजनेतील उत्पन्न मर्यादा सहा लाखावरून आठ लाख करण्यात आली आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी बसल्या जागेवरून विरोधकांकडून टिप्पणी करण्यात आली. यावर चिडून मुनगंटीवार म्हणाले, ""मराठा समाजासाठी ही उत्पन्न मर्यादा महत्वाची आहे. तिची खिल्ली उडवु नका. अन्यथा पुढच्या वेळेस तुम्हाला जनता निवडून देणार नाही'.

मुनगंटीवार म्हणाले, "मुंबई नागपूर समृध्दी महामार्ग राज्यासाठी महत्वाचा आहे. नागपूर मुंबई एक्‍सप्रेस वेसाठीच्या भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेली भूमोजणी 99 टक्के पुर्ण झाली आहे. तर भूसंपादनाची 64 टक्के प्रक्रिया पूर्ण झाले आहे. काम एप्रिलमध्ये सुरू होणे अपेक्षित आहे'.

 • यावेळी बोलाताना मुनगंटीवार म्हणाले -
 • अरबी समुद्रातील शिवस्मारक 36 महिन्यात पूर्ण करु.
 • शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 • सेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
 • नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.
 • मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रोची कामे सुरु आहेत.
 • ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी 17 हजार कोटी रुपयांची तरतूद.
 • इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद.
 • राज्यात अनेक ठिकाणी लॉजेस्टिक पार्क उभारणार.
 • सूत गिरण्यांना प्रति युनिट 3 रुपयाने वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
 • राज्यात अनेक ठिकाणी लॉजेस्टिक पार्क उभारणार.
 • जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत पाच हजार गावं टंचाईमुक्त करण्याचं उद्दिष्ट.
 • ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी 17 हजार कोटी रुपयांची तरतूद.
 • जलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद.
 • सूत गिरण्यांना प्रती युनिट 3 रुपयांना वीज देण्याचं काम करणार.
 • स्वदेशीकरणाचा भाग म्हणून सूक्ष्म आणि लघु उद्योगांना संरक्षण देणार.
 • मागेल त्याला शेततळे यामुळे 62 हजार शेततळी निर्माण झाली, यासाठी 160 कोटी एवढा निधी.
 • कोकणातील खार बंधाऱ्याच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबवणार, तसेच अस्तित्वातील खार बंधाऱ्याची दुरुस्ती करणार, यासाठी 60 कोटींची भरीव तरतूद.
 • कोकणातील आंबा उत्पादकांना विशेष प्रोत्साहन देण्यात येईल.
 • आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे.
 • समुद्र किनाऱ्यांच्या संवर्धनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबवणार.
 • कोकणातील आंबा आणि काजू उत्पादन वाढवण्यासाठी 100 कोटींची तरतूद.
 • वृक्षलागवड आणि रोपवाटिका यासाठी 15 कोटींची तरतूद.
 • सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद.
 • आतापर्यंत 35.68 लाख शेतकऱ्यांना 13,782 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.
 • शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाला अनुसरुन उत्पादन खर्च मर्यादित राहिल या उद्देशाने सेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय, ह्या स्वतंत्र योजनेसाठी 100 कोटींचा निधी.
 • समृद्धी महामार्गाच्या अंतर्गत गोदामं, शीतगृह उभरण्याचा मानस.
 • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी निधीची भरीव तरतूद.
 • एसटीच्या माध्यमातून शेतमाल वाहून नेण्याची योजना तयार करण्यात येईल.
 • राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टलवर आणणार.
 • प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय.
 • मानव विकास मिशनसाठी 350 कोटींची तरतूद.
 • राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजनेची मर्यादा ६ लाखांवरुन ८ लाखापर्यंत वाढवली.
 • महापुरुषांचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी संकेतस्थळांची निर्मिती, ४ कोटींची तरतूद.
 • खाजगी सहभागातून राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार.
 • चक्रधर स्वामी यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन केले जाईल.
 •  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhir mungantiwar maharashtra budget