आता काश्मिरी पंडितच नव्हे तर सर्वकाही आठवेल; मुनगंटीवारांचा टोला

Sudhir Mungantiwar said, now he will remember everything
Sudhir Mungantiwar said, now he will remember everythingSudhir Mungantiwar said, now he will remember everything

मुंबई : सरकार जात असताना काश्मिरी पंडित आठवेल, शरजील उस्मानी वाईट होता हे आठवेल, स्वातंत्र्यवीर सावरकर आठवले. सरकारमध्ये असताना अडीच वर्षांत काश्मीर पंडितांसाठी काही जागा आरक्षित ठेवू, त्यांना काही मदत करू अशी भूमिका या सरकारने घेतली नाही. आता काश्मिरी पंडितांबाबत हे बोलतात, असा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी लगावला. (Sudhir Mungantiwar said, now he will remember everything)

आदित्य ठाकरेंनी (aditya thackeray) केलेल्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार बोलत होते. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणी कोणाच्या नावावर मते मागितली हे सर्वांना माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनीही वरली विधानसभेत कोणाच्या नावाने मते मागितली हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. कोणी कोणाच्या नावाने मते मागायची आणि जनतेने कोणाला मत द्यायची आहे, हा जनतेचा अधिकार आहे, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Sudhir Mungantiwar said, now he will remember everything
शिवसेनेला आणखी एक धक्का, मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील

४० वराह गुवाहाटीत गेल्याचे शिवसेनेचे (shiv sena) नेते म्हणतात. ते आमदारांना वराह म्हणतात हे चुकीचे आहे. दानवांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू यांनी वराह अवतार घेतला होता. एका वराह अवताराने पृथ्वीला वाचवले होते. आता ४० वराह नक्कीच महाराष्ट्राला वाचवेल. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर कधी नव्हे इतक्या खाली नेण्याचा प्रयत्न हे लोक करीत आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

अनेक मोठे नेते धमकी देत आहे, हे चांगले नाही. तुम्हाला हे शोभत नाही. धमक्या द्याल तर हे कर्ज व्यासासकट तुम्हाला परत मिळेल, असेही सुधीर मुनगंटीवार शरद पवार व आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले.

Sudhir Mungantiwar said, now he will remember everything
आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती

आमदार KG 1 चे विद्यार्थी आहेत का?

तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही, हा तुमचा दोष आहे. भाजपला दोष देण्याचा दूरपर्यंत संबंध नाही. आमदार KG 1 चे विद्यार्थी आहेत का फूस लावून पळवून न्यायला. तुमच्याकडून चूक झाली. कारण, तुम्ही गर्वात होता. अभिमानात होता. काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तर भाजपला दोष देण्याचे काहीही कारण नाही., असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com