बँकेच्या ताब्यातील साखर कारखाने भाडेतत्त्वावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे - थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री करण्याऐवजी हे कारखाने भाड्याने देऊन त्यातून येणाऱ्या रकमेतूत थकीत कर्जांची वसुली करण्याचा निर्णय राज्य सहकारी बॅंकेने घेतला आहे. या निर्णयामुळे सहा महसुली विभागातील सुमारे २५ कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाने राज्य बॅंकेशी चर्चा करून आर्थिक अडचणीमुळे बॅंकेच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांना आवश्‍यक तेवढा कर्जपुरवठा व भांडवली पुरवठा करून चालू स्थितीत कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावर राज्य बॅंकेनेही त्यासाठी स्वतंत्र योजना बनविणे आणि त्यास न्यायालयाची मान्यता घेण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील बाणगंगा आणि भाऊसाहेब बिराजदार हे दोन कारखाने नुकतेच चालविण्यास दिले.

यासंदर्भात बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘‘थकीत कर्जप्रकरणी बॅंकेने सुमारे २५ कारखाने ताब्यात घेतले आहेत. त्यांचा लिलाव करून विक्री करण्यासाठी वारंवार बॅंकेकडून जाहिरात देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी थकीत रकमेवर वाढणारे व्याज, शेतकऱ्यांना ऊस देण्यासाठी लांबच्या कारखान्यांवर जावे लागणार आदींचा विचार करून हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य बॅंकेने घेतला आहे.’’

इच्छुकांना आवाहन
पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि नांदेड या महसुली विभागातील हे २५ साखर कारखाने आहेत. हे कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी कोणी इच्छुक असल्यास त्यांनी बॅंकेच्या मुख्य कार्यालयाच्या २२८००७०८ या क्रमांकावर कर्ज व वसुली विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: sugar factory on rental basis by state bank