साखर सहसंचालक कार्यालयासाठी जागेची पाहणी 

तात्या लांडगे
रविवार, 13 जानेवारी 2019

सोलापूर - जिल्ह्यात सद्यःस्थितीत 30 कारखाने असून आणखी दोन कारखान्यांची भर त्यात आगामी काळात पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने सोलापुरात साखर सहसंचालक कार्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने सरकारस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी नागरी बॅंक, औद्योगिक बॅंक आणि सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय या तीन जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या इमारतीला प्राधान्य राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरचा राज्यात नावलौकिक आहे. दुष्काळी रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल खरीप पिकांकडे वाढत आहे. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यात दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे कारखान्यांची संख्याही वाढत आहे. प्रत्येक गाळप हंगामासह अन्य कामांसाठी कारखानदारांना पुणे अथवा मुंबईला हेलपाटे मारावे लागतात. त्याचा त्रास कारखानदारांना सहन करावा लागतो. परंतु, सोलापुरातच साखर सहसंचालक कार्यालय सुरू झाल्यानंतर तो त्रास कमी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आगामी वर्षभरात हे कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

साखर गाळप, साठा, इथेनॉल यासह गाळप परवानग्यासाठी पुण्याला कारखानदारांना हेलपाटे मारावे लागतात. जिल्ह्यातील कारखान्यांची वार्षिक उलाढाल 10 हजार कोटींपर्यंत असून आता साखर उपायुक्‍तांचे सहसंचालक कार्यालय सोलापुरात झाल्याने कारखानदारांची सोय होईल. 
- उमेश परिचारक, युटोपियन शुगर, कचरेवाडी 

साखर आयुक्‍त कार्यालयातील कारभार पारदर्शक दिसून येत नाही. त्याठिकाणी कारखानदारांना विविध परवानग्या देताना काय भानगडी चालतात याची जाण असूनही सहकारमंत्र्यांनी त्यात सुधारणा केल्याचे दिसत नाही. साखर आयुक्‍तालयासह नव्या कार्यालयात पारदर्शक कारभाराची अपेक्षा आहे. 
- राजन पाटील, लोकनेते, अनगर

Web Title: Sugar Joint Director Office Place Watching