राज्यातील साखर उत्पादन घटणार

Sugar
Sugar

पुणे - राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा किमान दोन लाख टनाने घटण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनाचा शासकीय अंदाज ५८ लाख टनाचा असला तरी ५३ ते ५५ लाख टन साखर तयार होईल, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. 

दुष्काळ, अतिवृष्टी आणि इथेनॉल अशा तीन मुख्य मुद्यांचा विचार करता यंदा साखर उतारा घटणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सहकार विभागाच्या म्हणण्यानुसार, उसातील साखर उतारा फारसा घटणार नसून फक्त एक ते दीड टक्का साखर ही आता बी हेव्ही प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहेत. 

“साखर उत्पादन जरी कमी होणार असला तरी मूळ उतारा घटत नसून साखरेचा अंश बी हेव्ही प्रकल्पात वापरला जाऊन त्यामुळे इथेनॉलनिर्मिती वाढेल व तो पैसा देखील साखर कारखान्यांचा मिळेल,” असा युक्तिवाद प्रादेशिक साखर सहसंचालकांमधील कर्मचारी करतात. साखर कारखाना उद्योगाच्या म्हणण्यानुसार, यंदा उतारा कमीच मिळेल. कारण, कारखान्यांना अतिवृष्टी आणि दुष्काळांचा फटका बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com