साखर विक्रीत नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

माळेगाव - आर्थिक मंदीचे सावट असताना शेतीमालाला बाजार मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. अशा प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी माळेगाव साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी यंदा कांडे पेमेंट देण्याची परंपरा मोडीत काढली आहे. गरीब शेतकऱ्यांना सभासद करण्यासाठी मागे पळविले, साखर विक्रीच्या मनमानीत सभासदांचे नुकसान झाले, हीच का तुमची सहकार चालविण्याची  पद्धत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सभासद बचाव कृती समितीने केला आहे. तसेच, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे व संचालक चंद्रराव तावरे यांच्या कारभाराविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे जाहीर केले. 

माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक व सभासद बचाव कृती समितीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार १३ ते २२ ऑगस्टपर्यंत गावोगावी संपर्क दौरा केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये समितीचे प्रमुख व संचालक बाळासाहेब तावरे बोलत होते. या वेळी मदनराव देवकाते, संभाजी होळकर, योगेश जगताप, संजय देवकाते, एस. एन. जगताप, बाबूराव चव्हाण, तानाजी कोकरे, अनिल जगताप, विठ्ठल देवकाते आदींनी भूमिका मांडली. 

योगेश जगताप म्हणाले, ‘‘विरोधक असताना रंजन तावरे यांनी कांडे पेमेंट, सभासदांच्या ऊस गाळपाला प्राधान्य आणि अधिकच्या पहिल्या हप्त्यासाठी दोन्ही हातांनी बोंब मारत आंदोलने केली. कारखाना बंद पाडला.  

त्या प्रवृत्तीला आता सत्तेत आल्यानंतर चंद्रराव तावरे यांनी साथ दिली. हे सत्ताधारी सत्तेचा बेकायदा वापर करून गाड्या, वारेमाप पैसा वापरून राजकारणापायी माणसे सांभाळण्याचे काम करतात. अर्थात, हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे.’’ 

उद्यापासून दौऱ्यास सुरवात
माळेगाव कारखान्याच्या कारभारामुळे सभासदांमध्ये निर्माण झालेला असंतोष बाहेर पडण्यासाठी या संपर्क दौऱ्याचे आयोजन केले आहे. सोमवार (ता. १३) ते बुधवार (ता. २२) या कालावधीत दररोज सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत गावोगावी सभांचे नियोजन आहे. या दौऱ्याची सुरवात सोनगाव, मेखळी, घाडगेवाडीपासून होणार आहे, अशी माहिती सभासद बचाव कृती समितीने दिली.

हे कसले सहकाराचे पुरस्कर्ते? - देवकाते
शिवनगर शिक्षण संस्थेच्या कारभारात सभासदांच्या प्रतिनिधींना (संचालक) हेतुपुरस्सर डावलले जाते, याकडे लक्ष वेधत मदनराव देवकाते म्हणाले, ‘‘हेच अध्यक्ष विरोधात असताना कारखान्याच्या संचालकांना शिक्षण संस्थेत पूर्णाधिकार देण्यासाठी वार्षिक सभेत टाहो फोडायचे. आता मात्र वर्षानुवर्षे संचालकांना निमंत्रित म्हणूनसुद्धा बोलावीत नाहीत. शेतकऱ्यांना कारखान्याचे सभासद करून घेत नाहीत, त्यामुळे हे कसले सहकाराचे पुरस्कर्ते?’’

Web Title: Sugar sales loss