राज्यात उसाचे ५६८ लाख टन गाळप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

६०.८२ लाख टन साखर उत्पादन; उताऱ्यात ०.१५ टक्‍क्‍याने वाढ  
भवानीनगर - राज्यात आजअखेर १९१ साखर कारखान्यांनी दैनंदिन ७ लाख टनांच्या गाळप क्षमतेने आतापर्यंत ५६८ लाख टन उसाचे गाळप केले असून, ६०.८२ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा साखर उतारा ०.१५ टक्‍क्‍याने अधिक मिळाला असून, सध्या राज्याचा साखर उतारा सरासरी १०.७० टक्के आहे.

राज्यातील मागील वर्षी १८२ साखर कारखाने जानेवारी महिन्यात गाळपात होते. त्या कारखान्यांनी सरासरी दैनंदिन ६.६४ लाख टन उसाचे गाळप केले होते. आजअखेर मागील वर्षी ५०३ लाख टन उसाचे गाळप होऊन ५३.१४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्या वेळी साखर उतारा १०.५५ टक्के होता. मात्र, या वर्षी थंडीचे वाढलेले प्रमाण व पावसाने दिलेल्या ताणामुळे साखर उताऱ्यात वाढ झाल्याचे सांगतले जात आहे. 

राज्यात आजअखेर गाळपात पुणे विभाग अपेक्षेप्रमाणे आघाडीवर आहे. या विभागातील ६२ साखर कारखान्यांनी २३२ लाख टन उसाचे गाळप केले असून, या कारखान्यांनी १०.५२ टक्के साखर उतारा मिळवून २४.४६ लाख टन साखर उत्पादित केली आहे. कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपली आघाडी कायम ठेवली आहे. कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी १२६ लाख टन उसाचे गाळप करीत १५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा राज्यात सर्वाधिक ११.८७ टक्के साखर उतारा आहे.

Web Title: Sugarcane 568 lakh Tone Galap in State