साखरेचा ६० हजार कोटींचा गाळप हंगाम

नवा उच्चांक : १३८ लाख टन साखर उत्पादन; १०० कोटी लिटर इथेनॉल तयार
sugarcane crushing season 138 lakh tonnes sugar production 100 crore liters ethanol produced solapur
sugarcane crushing season 138 lakh tonnes sugar production 100 crore liters ethanol produced solapuresakal

सोलापूर : राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला असून निर्यात केलेल्या साखरेलाही चांगला भाव मिळाला आहे. देशात दरवर्षी सरासरी ३१२ लाख टन साखर उत्पादित होते. पण, यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आणि गाळ हंगाम खूपच लांबला.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ऊस शिल्लक असून काही कारखान्यांचे गाळप सुरुच आहे. राज्याच्या आतापर्यंतच्या गाळप हंगामात २०१८-१९ मध्ये सर्वाधिक ११२ लाख टन साखर तयार झाली होती. पण, यंदा १३८ लाख टनाचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी ८१ कोटी लिटर इथेनॉल तयार केले होते. यंदाच्या हंगामात १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले आहे.

केंद्र सरकारने निर्यातीसाठी यंदा कोणतेही अनुदान दिली नाही. तरीही, राज्यातून मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात झाली आणि त्याला ३२ हजाराचा दर मिळाल्याने कारखान्यांना त्याचा मोठा फायदा झाला. शेतकऱ्यांनाही दोन हजार ८०० रुपयांपासून तीन हजार १०० रुपयांपर्यंत ‘आएफआरपी’ मिळाली. इथेनॉलसाठी प्रतिलिटर ६० रुपयांचा दर मिळाल्याने बऱ्याच कारखान्यांनी त्याला प्राधान्य दिले. राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम घेतला.

यंदाच्या हंगामाची वैशिष्ट्ये...

  • १९७ साखर कारखान्यांनी पहिल्यांदाच केले १३८ लाख टन साखर उत्पादन

  • साखर उत्पादनातून मिळाले ४३ हजार ८४० कोटी रुपये

  • रेक्टिफाइड स्पिरिटमधून कारखान्यांना मिळाले चार हजार कोटींचे उत्पन्न

  • को-जनरेशन व इथेनॉलमधून मिळाले १२ हजार कोटी रुपये

  • केंद्राच्या निर्यात अनुदानाशिवाय इंडोनेशिया, मध्य पूर्व आशियात ९५ लाख टन साखर निर्यात

पुढील हंगाम ऑक्टोबरमध्ये

मागील दोन-तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने राज्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा त्यात आणखी वाढ झाली आहे. १६ महिन्यांहून अधिक काळ होऊनही कारखाने गाळपासाठी ऊस नेत नसल्याने बऱ्याच उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्ण फड पेटवून दिले. अशी परिस्थिती पुढील हंगामात होऊ नये म्हणून आगामी गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन आतापासूनच केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com