सांगली : यंदा ऊसदराचे तीन तुकडेच

एफआरपी निकष बदलाचा परिणाम; एकरकमी आंदोलन विरणार
sugarcane
sugarcanesakal

सांगली ः एफआरपी ठरविण्याचा निकष बदलल्याने यंदा ऊस दराचे तीन तुकडे होणार, हे जवळपास आता नक्की झालेले आहे. एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या भूमिकेकडे आता लक्ष राहणार आहे. आंदोलन सध्यातरी विरेल, असे चित्र आहे. राज्यातील साखर कारखानदार, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने यापूर्वीच बिलांचे टप्पे करावेत, असे स्पष्ट केले होते. तुकडे करत असताना गुजरातमधील गणदेवी कारखान्याप्रमाणे दर मिळावेत, अशी संघटनेची मागणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा एकरकमी एफआरपीसाठी आजही आग्रह कायम आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत आतापर्यंत गेल्या गळीत हंगामातील साखर उताऱ्यावर पुढील गळीत हंगामाची एफआरपी केंद्र सरकार ठरवत होते; परंतु त्यात महत्त्वपूर्ण बदल करून चालू हंगाम सन २०२१-२२ हंगामाच्या साखर उताऱ्यानुसार एफआरपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. केंद्राच्या ग्राहक हित, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ऊस नियंत्रण आदेश- १९६६ च्या कलम-११ द्वारे राज्यांना अधिकार दिले आहेत. ऑक्टोबर, २०२० मधील अधिसूचनेनुसार कारखानानिहाय एफआरपीसाठी साखर हंगाम २०१९-२० पासून पुढे ज्या राज्याच्या क्षेत्रात कारखाने आहेत त्या कारखान्यासाठी एफआरपीचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.

sugarcane
ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

सुधारित नियमाने यंदाच्या हंगामापासून एकरकमी एफआरपीची रक्कम आता ऊस तोडल्यानंतर एक महिन्याभरात ६० टक्के, हंगाम संपल्यानंतर २० टक्के आणि त्याचा पुढचा हंगाम सुरू होताना २० टक्के, अशी तीन तुकड्यांत देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. देशभरातील साखर कारखान्यांचा वाढता तोटा आणि एकरकमी एफआरपी देण्यासाठी घ्यावे लागणारे कर्ज, यामुळे कारखान्यांवर बोजा वाढून ते अडचणीत येतात. म्हणून हे धोरण येत आहे.

"शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर मिळण्यासाठी बिलाचे तुकडे होणे तोट्याचे नाही. मात्र, गुजरातमधील गणदेवीप्रमाणे दर देण्यातही राज्यातील कारखानदारांनी पुढे यायला हवे. फक्त बिलांच्या तुकड्याचेच स्वागत, दरात मात्र मागेच, ही परिस्थिती बदलायची जबाबदारी आता कारखानदारांची आहे."

- संजय कोले, शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com