आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणमंत्र्यांकडून स्वागत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 50 मुला-मुलींनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मगळवारी मंत्रालयात भेट घेतली.

मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 50 मुला-मुलींनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मगळवारी मंत्रालयात भेट घेतली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 350 मुलं-मुली व शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी गेल्या नऊ वर्षांपासून नाशिक येथील आधारतीर्थ आश्रमात राहत असून तेथेच शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळेतील मुलांनी तावडे यांची भेट घेतली. आमच्या वाट्याला जे दु:ख आले ते इतर शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, या उद्देशाने ही सर्व मुले-मुली गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रबोधनाचे काम करीत आहेत. या कामाचे तावडे यांनी कौतुक केले.

Web Title: suicide affected farmer child honour by education minister