'अतिक्रमण हटाव'विरोधात आत्महत्येचा प्रयत्न
नगर : सीना नदीतील साईप्रेम ढाब्याचे अतिक्रमण हटविण्यास विरोध करीत सोमवारी सकाळी ढाबाचालक पांडुरंग तुकाराम बोरुडे (वय 62) यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात बोरुडे यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अखेर ढाबा जमीनदोस्त केला.

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार सीना नदीतील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे. साईप्रेम ढाब्याचे अतिक्रमण काढण्यासाठी आज सकाळी दहा वाजता पथक पोचले. पथकाला पाहताच बोरुडे हे रॉकेलच्या दोन बाटल्या व विषारी औषधाची बाटली घेऊन ढाब्याच्या छतावर जाऊन बसले. त्याच वेळी पोलिसांचे पथकही दाखल झाले. बोरुडे यांनी विषारी औषधाची बाटली तोंडाला लावली. हा प्रकार पाहताच बोरुडे यांचा मुलगा प्रल्हाद छतावर धावला. त्याच्या मागे महापालिका अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी छतावरून बोरुडे यांना खाली आणले.