सुकन्या समृद्धी योजना बेकायदा आणि शरियाच्या विरोधात असल्याचा इस्लामी पंडितांचा दाव

सुकन्या समृद्धी योजना बेकायदा आणि शरियाच्या विरोधात असल्याचा इस्लामी पंडितांचा दाव

नवी दिल्ली (पीटीआय) : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी "सुकन्या समृद्धी' योजना (एसएसवाय) ही इस्लामच्या शरीया कायद्यानुसार बेकायदा असल्याचा ठराव इस्लामधर्मीय कायदेपंडितांच्या एका गटाने केला आहे. या योजनेत व्याजाचा अंतर्भाव होत असल्याने ते शरियाच्या विरोधात असल्याचा दावा या कायदेपंडितांनी केला आहे. 

लहान मुलींच्या भविष्यासाठी "सुकन्या समृद्धी' ही अल्प बचतीची सरकारी योजना आहे. ही योजना व्याजावर आधारित असल्याने ती शरियानुसार अवैध आहे. म्हणूनच "जमियत उलेमा ए हिंद' या संघटनेने आयोजित केलेल्या परिषदेत योजनेविरोधात ठराव करण्यात आला, अशी माहिती संघटनेचे माध्यम प्रमुख अझीमुल्लाह सिद्दिकी यांनी दिली. या ठरावात म्हटल्याप्रमाणे "सुकन्या समृद्धी'त दहा वर्षांखालील मुलीच्या नावे तिचे पालक बॅंक खाते सुरू करून त्यात पैसे भरतात. नऊ टक्के व्याजदराने बॅंक दर वर्षी व्याज खात्यावर जमा करते. यानुसार यातील रक्कम वाढत जाते. या योजनेत व्याजाचा अंतर्भाव असून, ही गोष्ट इस्लामच्या विरोधात आहे. या परिषदेला इस्लामी विद्वान व कायदेपंडित मौलाना कारी मोहंमद उस्मान मन्सुरपुरी, मौलाना हबिबूररहमान खैराबादी आदींस 200 जण उपस्थित होते. 

"बेटी बचाव, बेटी पढाव' या मोहिमेत सुकन्या समृद्धी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये अमलात आणली. मुलींचे शिक्षण आणि विवाहासाठी पैशांची बचत करणे पालकांना शक्‍य व्हावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. 

परिषदेतील अन्य ठराव 
- मोबाईलद्वारे होणारे आर्थिक व्यवहारांना मान्यता 
- कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट, कॅबसाठीची ऍप कायदेशीर 
- वैध उत्पादनांच्या जाहिरातीसाठी "गुगल ऍडसेन्स'चा वापराला परवानगी 
- चित्रपट व अनैतिक कार्यक्रमांच्या प्रचारासाठी प्रतिबंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com