राज्यामध्ये उन्हाचा चटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चोवीस  तासांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी अकोला येथे सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व कर्नाटक परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने गुरुवारी सकाळपासून अचानक हवामानात बदल झाला. यामुळे मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, विदर्भातील यवतमाळ, नागपूर जिल्ह्याच्या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तुरळक ठिकाणी विजांच्या कडाकडाटासह गारपीट झाली. 

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कमाल तापमानाचा पारा सातत्याने वाढत होता. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कमी दाबाच्या पट्ट्याची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे काही भागांत कमाल तापमानात किंचित कमी-जास्त होत आहे. 

पुण्यात तापमानाची चाळिशी
शहरात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३.४ अंश सेल्सिअसने वाढून ४०.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. लोहगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चोविस तासांमध्ये शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याने कमाल तापमानाचा पारा अंशतः कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Summer heat Temperature Increase