महा 'उष्ण' राष्ट्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

‘मे’ हिटमध्ये राज्याची सर्वाधिक होरपळ
पुणे - ‘मे’ महिना म्हटले की, आपल्यासमोर उभे राहते ते रणरणत्या राजस्थानचे चित्र. पण, यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र देशात सर्वाधिक ‘उष्ण’ राज्य ठरल्याचे दिसून आले आहे. विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा या शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने राजस्थानमधील फालोडीपेक्षाही जास्त उसळी मारली आहे. 

उन्हाळ्यात सर्वाधिक उष्णता राजस्थानमध्ये असते. तेथे कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असतो. त्यामुळे उन्हाळ्यातील पर्यटनासाठी उत्तर भारतापेक्षा दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाण्याचा पर्यटकांचा कल असतो. यंदाच्या मेमध्ये मात्र, राजस्थानच्या बरोबरीने महाराष्ट्रातही उन्हाचा चटका अधिक जाणवला असल्याचा निष्कर्ष भारतीय हवामान खात्याच्या माहितीवरून काढता येतो.

या महिन्याच्या २९ दिवसांमध्ये नोंदविण्यात आलेल्या देशातील ३९५ शहरांमधील कमाल तापमानाची माहिती ‘सकाळ’ने घेतली. त्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील शहरांमध्ये नोंदल्या गेले. चंद्रपूरचे सरासरी कमाल तापमान ४१.३ अंश सेल्सिअस एवढे राहिले. या मेमधील २९ पैकी आठ दिवस देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद झाली आहे. कमाल तापमानाची नोंद केलेल्या २९ पैकी १३ दिवस विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि वर्धा या शहरांमध्ये देशातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले.

त्या खालोखाल राजस्थानचा क्रमांक लागतो. राजस्थानमधील फालोडी, गंगानगर आणि चुरू या शहरांमध्ये मिळून ११ दिवस राजस्थान देशात उष्ण म्हणून नोंदले गेले. तर, मध्य प्रदेशमधील खजुराहो आणि सवाई माधोपूर या शहरांमध्ये देशातील पाच दिवस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. आगामी काही दिवसांमध्ये हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: summer temperature heat environment