चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पारा 45.3 अंश सेल्सिअसवर; सोमवारी पावसाची शक्‍यता
पुणे - चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदला गेला. बुधवारी चंद्रपूर हे देशातील उच्चांकी तापमानाचे (४५.४) शहर म्हणून नोंदले गेले. गुरुवारीदेखील चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या सोमवारी (ता. २३) ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उकाडा वाढला आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत.  

कोकणचा दक्षिण भाग आणि गोव्याच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे.

तसेच, हिंदी महासागर आणि मालदीवचा परिसर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. कर्नाटक, रायलसीमा ते तमिळनाडूचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येत्या रविवारी (ता. २२) विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता. २३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रमुख शहरांतील तापमान
जळगाव - ४२.८
सांगली - ४०.४
सोलापूर - ४२.२
परभणी - ४३.८
अकोला - ४४
बुलडाणा - ४१
ब्रम्ह्मपुरी - ४४.३
चंद्रपूर - ४५.३
गोंदिया - ४४.४

Web Title: summer temperature increase