राज्यात आज उष्णतेची लाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्यातर्फे राज्यातील ३० शहरांमधील कमाल तापमानाची नोंद रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केली. त्यापैकी २२ शहरांमधील कमाल तापमान चाळिशीपार झाले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

मॉन्सून जैसे थे  
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मंगळवारपर्यंत (ता. २१) उत्तर अंदमानापर्यंत मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान असून, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, उत्तर अंदमान बेटांवर मॉन्सून पोचण्याची पोषक स्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Temperature Increase Heat